नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

आरोग्य मित्र नितीन तायडेच्या रक्तदानामुळे वयोवृद्ध आजीला मिळाले जीवदान; अकराव्यांदा केले रक्तदान!


Advertisements
Ad 4

पाचोरा:तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य मित्र नितीन तायडे यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. सामनेर येथील एका वयोवृद्ध आजींची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रक्ताची अत्यंत तातडीची गरज भासत होती. मात्र, संबंधित रक्तगट तात्काळ कुठेही उपलब्ध होत नसल्याने आजींच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

ही गंभीर परिस्थिती समजताच आरोग्य मित्र नितीन तायडे यांनी कोणतीही दिरंगाई न करता स्वतः रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तातडीने रुग्णालयात पोहोचून त्या वयोवृद्ध महिलेला रक्त दिले आणि त्यांचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे, नितीन तायडे यांनी यापूर्वी १० वेळा रक्तदान केले असून, हे त्यांचे ११ वे रक्तदान होते. त्यांच्या या ऐनवेळच्या मदतीमुळे आजींना नवे जीवदान मिळाले आहे.

सदर वयोवृद्ध महिला पाचोरा शहरातील अजय सिंग परदेशी यांच्या ‘होम क्रिटिकल केअर हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल होत्या. नितीन तायडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि मानवतावादी भूमिकेबद्दल रुग्णालय प्रशासनासह आजींच्या कुटुंबीयांनी आणि संपूर्ण पाचोरा तालुक्यातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button