नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिक

पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वसीम शेख यांची जळगाव येथे बदली; भावूक वातावरणात निरोप समारंभ संपन्न


Advertisements
Ad 4

पाचोरा:पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले लोकप्रिय पोलीस कर्मचारी वसीम शेख यांची जळगाव येथे बदली झाली आहे. पाचोरा शहरातील कार्यकाळात सर्व धर्मीय व सर्व धर्मीय समाजातील घटकांना सोबत घेऊन, मिळून-मिसळून काम करणारे एक संयमी आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून वसीम शेख यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या बदलीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांना पाचोरा येथे भावूक वातावरणात निरोप देण्यात आला.

हा निरोप समारंभ पाचोरा पोलीस बांधव तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते इरफान मणियार आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वसीम शेख यांनी पाचोरा शहरात बजावलेल्या सेवेबद्दल आणि सामाजिक सलोखा जपल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button