नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्या

  महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल”च्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा


Advertisements
Ad 4

मुंबई  : महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील दालनात आढावा घेतला. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशीसंचालक बी. एन. पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पर्यटनवाढीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाबळेश्वरमधील महा फेस्टिवलसाठी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामांच्या जबाबदाऱ्यांविषयी श्री. देसाई यांनी निर्देश दिले. फेस्टिवल दरम्यान पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नयेस्वच्छतावाहतुकीचे नियोजनयेणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेवर जास्त लक्ष ठेवण्यासंदर्भात तसेच महोत्सवाच्या कामांसाठी जिल्हा आणि स्थानिक स्तरावर नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button