जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिक
पाचोऱ्याची मेघा मराठे यांना गणित विषयात ‘पीएचडी’; एम. एम. कॉलेजतर्फे गौरव

पाचोरा येथील सौ. मेघा राहुल मराठे यांनी गणित (Mathematics) या विषयात नुकतीच आचार्य (पीएचडी) पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल पाचोरा येथील एम. एम. कॉलेजचे प्राचार्य वासुदेव वले सर यांच्या हस्ते व इतर प्राध्यापक वर्गाच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या या मानाच्या पदवीमुळे मेघा मराठे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेघा मराठे या पाचोऱ्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रदीप मराठे यांच्या सूनबाई असून त्या एका गृहिणीने कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून गणितासारख्या विषयात डॉक्टर ही पदवी मिळवल्याने मराठे परिवाराचा अभिमान उंचावला आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी शहरातील विविध मान्यवर आणि शिक्षणप्रेमींनी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन केले आहे.





