परमेश्वर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड!

पाचोरा:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सुभाष पाटील यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. परमेश्वर पाटील हे पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील रहिवासी असून, ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचे खंदे व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पाचोरातील माजी नगरसेवक विकास पाटील यांच्याकडे या पदाची आतापर्यंत जबाबदारी होती परंतु मागील काळात त्यांनी भारतीय जनता पार्टी कडून नगरसेवकांसाठी उमेदवारी केल्यामुळे सदर पदाची जागा ही रिक्त असल्यामुळे या जागी नवीन होतकरू कार्यकर्त्याला संधी मिळणार असल्याचे अपेक्षित होते आणि पाटील यांच्या माध्यमातून हे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यात पक्षाला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते परमेश्वर पाटील यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. या पक्षीय जबाबदारीच्या प्रसंगी बंडू ढमाले, प्रेमराज नारायण पाटील, प्रशांत पाटील, अमोल धनगर, सुनील घोडसे यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर पाटील यांच्या निवडीबद्दल पाचोरा तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन केले जात आहे.





