नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिक

स्वराज्य करिअर अकॅडमीतर्फे पोलीस भरतीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार!


Advertisements
Ad 4

पाचोरा: येथील आर. डी. फाउंडेशन संचलित ‘स्वराज्य करिअर अकॅडमी’च्या वतीने चालू वर्षी पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ३० मे रोजी उत्साहात पार पडला. या गौरव समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. गणगे साहेब, ए.एस.आय. मोरे साहेब, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. चिंचोले सर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पी.एस.आय. गणगे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, पोलीस दलातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तर प्रा. चिंचोले सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल देवेन संजय पाटील, राजश्री दिगंबर पाटील आणि पूजा बापू पाटील, तसेच एस.आर.पी.एफ. (SRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल माजी सैनिक वीरेंद्र दिनकर पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. “स्वराज्य करिअर अकॅडमीच्या यशाचा आलेख असाच दरवर्षी उंचावत राहील आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुले अधिकारी व्हावीत, यशस्वी व्हावीत यासाठी आपली संस्था नेहमीच कटिबद्ध व प्रयत्नशील राहील,” असा विश्वास अकॅडमीचे प्रमुख प्रा. स्वप्नील मराठे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी मैदानी प्रशिक्षक शुभम गायकवाड सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button