नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिक

अन्नभेसळ विभागाच्या माध्यमातून पाचोऱ्यात अनेक खाद्यपदार्थांची दुकाने तपासली,कारवाईची केवळ अफवा! स्वच्छता राखणेबाबत विभागाच्या वतीने आवाहन


Advertisements
Ad 4

राहुल म्हणज,पत्रकार | पाचोरा:अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या माध्यमातून आयुक्त तुकाराम मुंडे हे सध्या राज्यात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या या धडक आणि पारदर्शक कामाचे सत्ताधारी तसेच विरोधक अशा सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. वरिष्ठ स्तरावर आतापर्यंत या कारवाया मोठ्या प्रमाणावर होत होत्या. मात्र, आता आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, ‘मधुर खानदेश’ वृत्तपत्राशी विशेष वार्तालाप करताना अन्नभेसळ अधिकारी शिंदे साहेब यांनी हॉटेल चालकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “या तपासणी मोहिमेमुळे हॉटेल चालकांनी कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये स्वच्छता आणि शुद्ध पाणी राखणे गरजेचे आहे. ग्राहकांना कुठलीही वस्तू घेण्यासाठी जबरदस्ती करू नये; ग्राहक त्यांच्या मर्जीने पाण्याची बॉटल मागत असतील तरच ती त्यांना द्यावी. तसेच, हॉटेलच्या किचनमध्ये पूर्णपणे स्वच्छता असावी आणि खाद्यपदार्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे हानिकारक रंग, टेस्टिंग पावडर किंवा भेसळयुक्त पदार्थ वापरले जाणार नाहीत, याची काटेकोर काळजी घ्यावी.”

  • पाचोऱ्यात कारवाईची केवळ चर्चा; प्रशासनाचा खुलासा

दरम्यान, पाचोरा शहरात आज एका नमकीन दुकानदारावर एफडीएकडून मोठी कारवाई झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. या वृत्तामुळे स्थानिक व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, पाचोरा शहर किंवा तालुक्यात आज अशी कुठलीही ठोस कारवाई झालेली नसल्याची प्राथमिक व अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाची सूचना: प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा भेसळखोरांवर येत्या काळात तीव्र कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button