नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराजकारण

पाचोऱ्यातील शिवसैनिकांना जिल्ह्याची जबाबदारी! दोन पत्रकार बांधवांची राजकारणाकडे वाटचाल तर कृष्णपुरीतील शेतकरी पुत्राला देखील वरच्या फळीत स्थान


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा : दि. 13 मे 2025 रोजी हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षातील पाचोरा व भडगांव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मागील काळामध्ये उत्कृष्ट शेती विषयक बातम्या टाकून शेती विषयक बातम्या प्रकाशित करून शेतकऱ्यांनान्याय देण्याचे पत्रकार म्हणून काम करणारे सुनिल रंगराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी सेना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच तळागाळातील कार्यकर्ते कृष्णापरी परिसरातील रहिवासी असलेले शेतकरी पुत्र हेमंत ज्ञानदेव चव्हाण यांची शेतकरी सेनेच्या उपजिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पाचोरा शहरात वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत समाजसेवेचा वसा हाती घेतलेले अभ्यासू पत्रकार प्रविण हरिषचंद्र ब्राम्हणे यांची भीमशक्ती शिवशक्ती जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर माहेजी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नरेश पंडितराव पाटील यांची जिल्हाध्यक्ष एस.टी. कामगार सेना म्हणून निवड करण्यात आली आहे.  सदर निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख मनोहर (रावसाहेब) पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. सदर निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button