नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

तुम्ही नगरपरिषदेचा कर भरला का? नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी असू शकते….पाचोरा नगरपरिषदेने केले गाळे सील!


Advertisements
Ad 4

पाचोरा नगरपरिषदेमार्फत शहरातील मालमत्ताधारक, दुकानधारक, गाळेधारक यांच्याकडून थकीत असलेल्या मालमत्ता कराची व पाणीपट्टी कराची वसुली सुरू असून जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार थकबाकीदार मालमत्ताधारकांवर व पाणीपट्टी धारकांवर नळ कनेक्शनची तोडणी करणे तसेच मालमत्ता सील करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याअंतर्गत पाचोरा नगरपरिषदेने ६ पथके तयार केलेली असून, पाचोरा शहरात सदर पथकांमार्फत थकीत कराची वसुली मोहीम सूरु आहे. त्यानुसार नगरपरिषद पथकामार्फत आज दिनांक २६/०३/२०२५ रोजी शहरातील भडगाव रोड पेट्रोल पंपासमोरील ४ गाळे व कृष्णापुरी भागातील जळगाव रोड वरील २ गाळे असे एकूण ६ गाळे मालमत्ता कराची रक्कम थकविल्यामुळे सील करण्यात आली. नगरपरिषदे मार्फत सदर थकीत मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आलेल्या असून, कर्मचारी यांनी सदर मालमत्ताधारकांना वेळोवेळी भेट देऊन सुद्धा कराची मागणी करून ही सदर मालमत्ताधारकांनी थकीत असलेल्या कराची रक्कम नगरपरिषदेस अदा केली नव्हती. त्यामुळे मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांच्या नियंत्रणाखाली कर अधिक्षक डी. एस. मराठे, व वसुली पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक २६/०३/२०२५ रोजी वरील ठिकाणी असलेल्या एकूण ६ गाळे सील केले. जप्ती, सीलिंग व नळ कनेक्शन तोडणीची कारवाई सुरू असून, आजपावेतो एकूण ५९ नळ कनेक्शनची तोडणी करण्यात आलेले आहे. तसेच सदरची कारवाई ही दररोज करण्यात येणार आहे. थकीत मालमत्ताकरांवर शासन नियमाप्रमाणे प्रति माह २% शास्ती आकारणी सुरू असून, शास्तीची तसेच जप्ती व सिलिंगची कारवाई टाळावयाची असल्यास नागरिकांनी आपापल्या थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व इतर अनुषंगिक कराच्या रक्कमा तात्काळ नगरपरिषदेच्या कार्यालयात जमा कराव्यात व आपल्यावर होणारी कटू कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी केले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button