नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा महावितरण विभागाचा 96% वसुलीचा टप्पा पूर्ण; दीड कोटींची यशस्वी वसुली


Advertisements
Ad 4

पाचोरा: दि. 16 एप्रिल 2025: पाचोरा महावितरण विभागाने 96% वीजबिल वसुलीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून, तालुक्यात तब्बल दीड कोटी रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती महावितरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे प्रमुख मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी, अधीक्षक अभियंता अनिल महाजन, पाचोरा विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता सखाराम दानवी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्युत सहाय्यक आणि वायरमन उपस्थित होते.

या यशस्वी वसुलीमुळे पाचोरा महावितरण विभागाने आपली कार्यक्षमता आणि समर्पण दाखवून चांगले काम केले असल्याचे मान्यवरांकडून सांगण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांनी विभागाच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या असून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या सतरा मुळे नक्कीच आमचे बळ अधिक बळकट होते व ऊर्जा निर्माण करण्याचे काम या सत्कारामुळे झाले असल्याचे प्रमोद हेलोडे व त्यांच्या टीमच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button