जळगाव जिल्हाताज्या बातम्या
जळगावच्या पाचोर्यात कुणाल कामराचा पुतळा जाळला! शिवसेनेचे पोलिसांत निवेदन

पाचोरा येथे आज दिनांक 26 मार्च 2025 दुपारी 5:30 वाजता रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या विरुद्ध विनोदाच्या माध्यमातून अश्लील भाषेत गाणं प्रसारित करणाऱ्या कुणाल कामरा या हास्य कलाकाराने केलेले कृत्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असून अशा अपशब्द वापरणाऱ्या कुणाल कामरा यांच्या विरुद्ध पाचोरा शिवसेना- युवासेना यांचा माध्यमातून पुतळा जाळून सदर विषयाचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी पाचोरा शहरातील तमाम शिवसैनिक तसेच युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

