जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात जय हिंद लेझिम मित्रमंडळ कृष्णापूरीच्या वतीने १४ एप्रिल निमित्ताने शरबत वाटप!

पाचोरा: दि. १४ एप्रिल २०२५ रोजी पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली असून यामध्ये सकाळी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले होते. व दिवसभर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम बांधव आले होते. त्याचबरोबर सायंकाळी पाचोरा शहरातून विविध प्रभागातून महामानवांची जयंती मिरवणूक करण्यात आल्या होत्या आणि या मिरवणुकी दरम्यान मिरवणुकीत सामील झालेल्या नागरिकांसाठी शरबत वाटपाचा कार्यक्रम पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जय हिंद क्रीडा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी जयंती मित्र मंडळाचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते.
