नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी किशोर बारवकर यांची बिनविरोध निवड

Advertisements
Ad 4

पाचोरा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी किशोर बारवकर यांची बिनविरोध निवड

ॲड. योगेश पाटील, शरद वाणी आणि अविनाश सुतार यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती

पाचोरा:पाचोरा नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष आणि रिक्त असलेल्या तीन नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसाठी आज, सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपाध्यक्षपदी श्री. किशोर गुणवंत बारवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर तीन जागांवर नामनिर्देशित सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेसाठी नगरपरिषदेचे एकूण २८ निर्वाचित सदस्य उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांकडे सकाळी ११ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. विहित मुदतीत केवळ किशोर गुणवंत बारवकर यांचाच अर्ज दाखल झाला. छाननीअंती सदर अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकाऱ्यांनी बारवकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

नगरपरिषदेत ३ नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया देखील यावेळी पार पडली. यामध्ये राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार खालीलप्रमाणे शिफारसी करण्यात आल्या होत्या:

शिवसेना पक्षाचे गटनेते सुमित किशोर पाटील यांनी ॲड. योगेश जगन्नाथ पाटील आणि *शरद बाळकृष्ण वाणी (पाटे) यांच्या नावांची शिफारस केली. भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. सुरज संजय वाघ यांनी अविनाश देविदास सुतार यांच्या नावाची शिफारस केली.

सादर केलेले तिन्ही प्रस्ताव छाननीअंती योग्य ठरल्याने, पिठासीन अधिकारी सौ. सुनिता पाटील यांनी या तिघांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

या निवडीच्या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. सुनिता पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक डी. एस. मराठे उपस्थित होते. निवड घोषित होताच नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी नगराध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले आणि सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button