नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; १५१५ लिटर गावठी दारू जप्त!


Advertisements
Ad 4

जळगाव: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर परिसरासह इतरही घातलेल्या छाप्यात तब्बल १५१५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून, सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या काळात अवैध मद्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांना रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर भागात गावठी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी नियोजनबद्ध रित्या ही कारवाई केली. या छाप्यात किरण सीताराम सोनवणे व विवेक विजय ढाके या दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा साठा आढळून आला. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग अधिक तपास करत आहेत.ही कारवाई अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी. एम. चकोर, एस. एम. मोरे,दुय्यम निरीक्षक जी. डी. अहिरे, ए. डी. पाटील,कर्मचारी पी. पी. तायडे, आर. डी. जंजाळे, धनसिंग पावरा यांच्या मदतीने करण्यात आली आहे. शहर आणि परिसरात अशाच प्रकारे इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले असून, अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. निवडणुकीच्या काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button