नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्सतर्फे उद्योजकांचा सन्मान


Advertisements
Ad 4

• पाचोऱ्यातील बॅनर व्यावसायिक मधुराज डिजिटलचे संचालक सुनील सोनार यांचा विशेष सत्कार.

पाचोरा येथे १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने पाचोरा शहरातील विविध छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्या बांधवांचा सत्कार सन्मान प्रसिद्ध सोन्याची व्यापारी असलेले मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स तर्फे करण्यात आला आहे. उद्योजक-व्यावसायिक म्हणून मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स सुवर्ण पेढीने व्यावसायिकांचा सन्मान करून त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले आहे. यामध्ये कार्यक्रमास दुग्धव्यवसाय ते या उद्योजक अशा विविध घटकांचा गुणगौरव झाला आहे. पेढीचे ज्येष्ठ संचालक रवींद्र सराफ आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि उद्योगविषयक पुस्तक भेट देऊन उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यात गणेश पवार (नित्यसेवा डे नाईट मेडिकल), रोहित महाजन (फ्लोअर बॉक्स कॅफे), श्री. किशोर वाणी (वृंदावन प्लंबिंग अँड हार्डवेअर), गौरव येवले (कीर्ती मेडिकल), सुनील सोनार (मधुराज डिजिटल), वंदना कांतायन (रीद्धीका होम फर्निशिंग), संजीत पाटील (राजलक्ष्मी ई बाईक अँड सोलर सिस्टीम), अभिजित पाटील (ब्रँड कट्टा), प्रदीप पाटील (न्यू गोपाल डेअरी), तुषार सूर्यवंशी (नील ऍक्वा), निलेश बोरसे (अल्फा जनरेटर्स अँड पॉवर सिस्टीम), आदित्य पाटील (आदित्य कन्स्ट्रक्शन्स), अजिंक्य वाघ (हॉटेल डब्लू), विकास सोनगीर (धनलक्ष्मी इ सर्व्हिसेस), राहुल पाटील (गणपती डिजिटल अँड फ्लेक्स प्रिंटिंग), मनोज पाटील, प्रदीप पाटील (अंबिका डेअरी), शरद भावसार (हिंगलाज चष्माघर), र), मनोज पाटील (पूजा मारुती सर्व्हिसेस अँड रोडलाईन्स), मंगेश बडगुजर (न्यू जय गणेश हार्डवेअर), अश्विन वाघ (वाघ डेअरी), सुभाष बडगुजर (साई होम डेकोर), योगेश पाटील (गजानन डेअरी), विकास सपकाळ (श्रीराम हार्डवेअर), विजेंद्र निकम (गंगाई कन्स्ट्रक्शन), निलेश सोनार (शिव रेडियम) आदींचा समावेश होता. तसेच हार्डवेअर, बांधकाम व्यवसाय ते फॅशन बँड, कृषिपुरक व्यवसाय ते होम डेकोर, इ बाईक ते इ सेवा इ. विविध क्षेत्रातील उद्योजक या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित होते. पाचोरा शहरातील प्रथमच उद्योजक व्यावसायिक यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करणारी मे. मुरलीधर अभिमान सराफ ही पहिलीच सुवर्ण पेढी ठरली आहे. महाराष्ट्र गीताने झाली तर पेढीचे युवा संचालक मयुर सराफ यांनी सर्वांचे स्वागत केले, प्रास्ताविक आनंद क्षेमकल्याणी यांनी केले, आभार प्रदर्शन सौ. अदिती मयुर सराफ यांनी तर सूत्रसंचालन पेढीचे कर्मचारी देविदास चौधरी, सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button