नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

पाचोरा पोलिस विभागाची कामगिरी; बसस्थानकावर चोऱ्या करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश! महिला होमगार्डांची सतर्कता


Advertisements
Ad 4

पाचोरा (राहुल महाजन,मधुर खान्देश): पाचोरा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये वडगांव खुर्द येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्रावण ताराचंद पाटील हे पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून १३,४०० रुपये लंपास केले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. २३ फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात तीन संशयीत महिला टेहळणी करत आहेत. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी त्यांची चौकशी केली असता, महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या संशयित महिला आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) निर्मला सुनील जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, जामनेर)
२) सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. हिसोडा खुर्द, जालना, ह.मु. कुंभारी, जामनेर)
३) उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, जामनेर)

महिला पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडे एकूण ३२,४०० रुपये रोख मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून ही रक्कम जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी, प्रियंका आहेर तसेच होमगार्ड सोनाली शशीकांत पाटील,कल्पना तानाजी निंबाळकर,संगीता मुरलीधर पाटील यांनी पार पाडली आहे. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील चोऱ्यांच्या घटनांना लगाम बसण्याची शक्यता असून, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button