नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जाहिरातताज्या बातम्याराज्य

पाचोरा येथे एस आर वेल्थ तर्फे ‘गुंतवणूकदार जागरूकता’ मेळावा संपन्न; ३०० हून अधिक नागरिकांचा सहभाग


Advertisements
Ad 4

पाचोरा: गुंतवणुकीचे नियोजन आणि आर्थिक साक्षरता काळाची गरज आहे, हा संदेश देण्यासाठी ‘एस आर वेल्थ’ तर्फे पाचोरा येथे ‘गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमाचे’ (Investor Awareness Program) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पाचोरा आणि परिसरातील ३०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून केवळ आर्थिक नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता, सामाजिक ऋणाची जाणीव ठेवत या कार्यक्रमात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. समाजातील ११ गरजू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास सोपा व्हावा आणि त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात तज्ज्ञांनी गुंतवणुकीचे विविध पर्याय, जोखीम व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून त्यांना सुरक्षित गुंतवणुकीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

“तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे. आर्थिक साक्षरतेसोबतच सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा आमचा मानस भविष्यातही असाच राहील,” असे एस आर वेल्थ, म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार देवयानी शिवाजी राठोड यांच्या तर्फे व्यक्त करण्यात आले.

या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी ‘एस आर वेल्थ’चे आभार मानले आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button