रोटरी क्लब पाचोरा-भडगाव तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त २५ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

पाचोरा (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात समाजातील विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमाच्या मंचावर रोटरी क्लबचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, उपप्रांतपाल किरण देशमुख, क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, डॉ. अजयसिंग परदेशी आणि पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या पीएसआय कल्याणी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात रोटरी क्लब पाचोरा-भडगावला मिळालेल्या ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ बद्दल शैलेश कुलकर्णी यांच्या ‘कलाछंद’ टीमचा मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच, रोटरीने आयोजित केलेल्या गणपती आरास सजावट स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या खालील महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला:
- प्रशासन व राजकारण: नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, तहसीलदार शीतल सोलाट, पीएसआय कल्याणी वर्मा.
- उद्योग व व्यवसाय: उद्योजिका वैशाली सूर्यवंशी, रुपाली जोशी, इशिता सेठ, अश्विनी पिंगळे (पिग्मी एजंट).
- शिक्षण व बँकिंग: उज्वला वाडेकर, सपना शिंदे, संगीता शिंदे (मॅनेजर, SBI).
- आरोग्य व सामाजिक: डॉ. संगीता पाटील, डॉ. प्रतिभा ढाकरे, सुरेखा खानोरे (गायत्री परिवार), कुंदा पाटील (पर्यवेक्षिका).
- कला व क्रीडा: रीलस्टार क्रांती पाटील, जयश्री मराठे (योग शिक्षिका).
- विशेष सेवा म्हणून आशा भुजंगे (रिक्षा चालक), सुनीता चव्हाण (सफाई कामगार, नगरपालिका) यांच्यासह रुपाली सांगडे, अनुपमा शेवाळे, चारुशीला नैनाव, दुर्गा राठोड, प्रगती शेळके आणि शीतल सूर्यवंशी, ममता अग्रवाल. कार्यक्रमात काही विशेष गौरव देखील करण्यात आले. यामध्ये रोटरी सदस्य स्व. अरुणा उदावंत यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच दत्तात्रय पाटील (अग्निशमन अधिकारी), मूकबधिर निवासी विद्यालय (पिंपळगाव हरे) आणि मानवेल सालोमन जॅक्सन डान्स अकॅडेमी यांचाही गौरव करण्यात आला. या सोहळ्याला भरत सिनकर, डॉ. घनश्याम चौधरी, डॉ. किशोर पाटील, संजय कोतकर, प्रदीप पाटील, राजेश मोर, निलेश कोटेचा, ज्ञानेश्वर पाचोळे,आरोग्य सेवक नितीन तायडे यांसह रोटरीचे अनेक सदस्य आणि नूतन सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. शिवाजी शिंदे व डॉ. प्रशांत सांगडे यांनी केले.





