नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा:पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा! वरिष्ठांकडे निवेदन


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले असून याबाबत खेड्यापाड्यातील असंख्य महिलांनी वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्रीशक्ती सामाजिक संस्था धुळेच्या महाराष्ट्र अध्यक्षा गीतांजलीताई कोळी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गावातील व हद्दीतील शिंदाड, वरखेडी, कुऱ्हाड खुर्द, सातगाव डोंगरी, कळमसरा, लोहारा, अंबे वडगाव, अंबे वडगाव तांडा नंबर एक व अंबे वडगाव तांडा नंबर दोन, लोहारी, या गावातील मुजोर हातभट्टी दारुची निर्मीती व विक्री करणारे तसेच सट्टा पेढ्या, जुगाराचे अड्डे कायमस्वरुपी बंद करण्यासाठी साकडे घातले होते. ०५ मे २०२५ सोमवार रोजी वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्रीशक्ती सामाजिक संस्थांच्या महाराष्ट्र अध्यक्षा गीतांजलीताई कोळी यांनी पाचोरा येथे येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे साहेबांची भेट घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गावातील व हद्दीतील गावागावात, गल्लीबोळात दिवसाढवळ्या सुरु अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लेखी निवेदन सादर केले. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 कलमी कार्यक्रम सुरू असून यामध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश सर रेड्डी यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे तर दुसरीकडे प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे काम काही अधिकारी कर्मचारी करत असल्याचे पंचक्रोशी चर्चा आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button