नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

भीषण उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा; सांगवी (प्र.लो.) बसस्थानक परिसरात ‘थंडगार’ पाणपोईचे सोय


Advertisements
Ad 4

पाचोरा:कुऱ्हाड (प्रतिनिधी):
“धन्य असो ज्याने थाटीली ही पाणपोई उन्हात, पिऊनिया पाणी दुआ देती सारे त्या सज्जनास….” या उक्तीप्रमाणे, वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सांगवी प्र. लो. बसस्थानक परिसरात ग्रामस्थांच्या सोयीसाठी थंड पाण्याच्या जारच्या (RO Water) पाणपोईचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
सांगवी येथील सरपंच सौ. सुवर्णा अधिकार पाटील व समस्त ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असून बसस्थानक परिसरात प्रवाशांची, शेतमजुरांची आणि वाटसरूंची मोठी वर्दळ असते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
भर उन्हात तहानलेल्यांना पाणी मिळणे हे पुण्याचे कार्य आहे, असे भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तरी सर्व नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून, शिस्तबद्ध पद्धतीने या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगवी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button