नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीयशैक्षणिक

पाचोऱ्याची कन्या डॉ. कादंबरी महाजन यांची गरुडझेप


Advertisements
Ad 4

फिजिओथेरपी पदवीसह कला आणि क्रीडा क्षेत्रातही उमटवला ठसा; आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरिओग्राफीत चमकली

पाचोरा: जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर एखादी व्यक्ती शून्यातून विश्व कसे उभे करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाचोरा येथील डॉ. कादंबरी संदीप महाजन. आपल्या कौटुंबिक परंपरेचा वारसा पुढे चालवत कादंबरीने वैद्यकीय शिक्षणासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकवला असून, तिचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
डॉ. कादंबरी यांनी नवी मुंबई येथील नामांकित एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी येथून ‘बॅचलर ऑफ फिजिओथेरपी’ (BPT) ही पदवी ८.०४ CGPA मिळवून यशस्वीपणे पूर्ण केली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता त्यांनी ‘न्यूरोलॉजिकल’ आणि ‘मस्क्युलोस्केलेटल’ आजारांच्या उपचारात विशेष प्राविण्य मिळवले आहे. विविध वैद्यकीय शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करून त्यांनी रुग्णांना व्यायामाचे महत्त्व आणि दुखापत प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगत सामाजिक बांधिलकीही जपली आहे.
वैद्यकीय क्षेत्रासोबतच डॉ. कादंबरी यांनी नृत्य आणि अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईतील सुमीत खेतान यांच्या संस्थेत कोरिओग्राफीचे प्रशिक्षण घेत असताना त्यांनी दुबई, बहरेन, कतार आणि अबुधाबी यांसारख्या देशांमध्ये नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. याशिवाय, गोरेगाव स्पोर्ट क्लब येथे झालेल्या भव्य नाट्यात त्यांनी ‘सीता मातेची’ मुख्य भूमिका साकारून आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी त्यांनी ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणूनही काम केले आहे.
कादंबरी यांची झेप केवळ कला आणि शिक्षणापुरती मर्यादित नाही. शालेय जीवनात त्यांनी खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत (नोएडा, दिल्ली) राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते. हे नेतृत्वगुण आणि ‘टीम स्पिरीट’ त्यांच्या आजच्या यशाचा पाया ठरले आहेत.
भविष्यात फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर शिक्षण (PG) घेण्यासोबतच, स्वतःचे ‘डान्स आणि झुम्बा’ क्लासेस सुरू करण्याचा डॉ. कादंबरी यांचा मानस आहे. याद्वारे लहान मुले, तरुण आणि वृद्धांना आरोग्याप्रति जागरूक करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

यशाचे श्रेय:
“माझ्या या यशात माझे वडील संदीप दामोदर महाजन, आई सौ. शितल महाजन (उपशिक्षिका, श्री गो से हायस्कूल) आणि बहीण डॉ. वैष्णवी यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ आहे,” अशा भावना डॉ. कादंबरी यांनी व्यक्त केल्या.

स्वातंत्र्य सैनिक डी. एल. महाजन यांच्या या नातीने मिळवलेल्या या बहुआयामी यशामुळे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button