नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

पाचोरा येथे LPG व CNG गॅस पंप उपलब्ध करा; ‘जय संघर्ष’ ग्रुपचे आमदार किशोर पाटील यांना निवेदन


Advertisements
Ad 4

आरटीओचा जाच कमी करण्याचीही केली मागणी; वाहनधारकांच्या समस्यांकडे वेधले लक्ष

पाचोरा (प्रतिनिधी):
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वाहन चालक आणि मालकांच्या विविध समस्यांनतर आता ‘जय संघर्ष’ वाहन चालक सामाजिक संस्थेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मतदारसंघात LPG आणि CNG गॅस पंपांची असलेली मोठी कमतरता दूर करावी आणि आरटीओ (RTO) प्रशासनाकडून होणारा दंड व ऑनलाईन चलनाचा जाच थांबवावा, या मागणीसाठी आमदार किशोर पाटील यांना संघटनेतर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले.

पाचोरा व भडगाव परिसरात प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. सध्याच्या काळात डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना, LPG आणि CNG हे पर्याय वाहनधारकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात. मात्र, या भागात गॅस पंपांची सुविधा नसल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. “LPG आणि CNG मुळे प्रदूषणात घट होईलच, पण वाहतुकीचा खर्च कमी झाल्याने चालकांचे आर्थिक संकटही दूर होईल,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आरटीओच्या दंड वसुलीवर आक्षेप

इंधनाच्या सुविधेसोबतच आरटीओ अधिकाऱ्यांकडून वाहनधारकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. विनाकारण ऑनलाईन चलन फाडणे आणि अव्वाच्या सव्वा दंड आकारणे या प्रकारांमुळे सर्वसामान्य वाहन चालक हवालदिल झाला आहे. हा त्रास तातडीने कमी करण्यासाठी आमदारांनी सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जय संघर्ष ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष प्रविण वाघ, शहराध्यक्ष दीपक पाटील, ग्रामीण अध्यक्ष संभाजी देवरे यांच्यासह गणेश चौधरी, गजानन माळी, सुपडू पाटील, सोपान बोरसे, आकाश पाटील, राहुल आमले, मुन्ना माळी, विशाल पाटील, सुनील पाटील, पिंटू बोरसे, उत्तम पाटील, दादू राढव, राजु पाटील, भैय्या तडवी आणि इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांनी या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे मतदारसंघातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button