नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात जितेंद्र जैन यांची छाप; उत्कृष्ट संघटन कौशल्याचे सर्वत्र कौतुक


Advertisements
Ad 4

जळगाव: श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात संपर्क प्रमुख जितेंद्र जैन यांनी आपल्या प्रभावी नियोजनाने आणि धडाडीच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वीपणे फत्ते केला असून, एक सक्षम संघटक म्हणून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू सहकारी असलेल्या जैन यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आणि उत्तम समन्वय राखत संघटनेला नवी उभारी दिली आहे. विधानसभा व स्थानिक निवडणुकांमधील दांडगा अनुभव आणि युवासेनेतील सक्रिय कार्यामुळे त्यांनी अल्पावधीतच कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला असून, त्यांच्या या कामगिरीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, मकवाना साहेब, नानासाहेब बछाव यांसह विविध जिल्हाप्रमुखांनी विशेष कौतुक केले आहे. या दौऱ्यातील त्यांच्या झंझावाती कामगिरीमुळे भविष्यात उत्तर महाराष्ट्रात संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button