नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाराजकारणराज्यराष्ट्रीय

ब्रेकिंग न्यूज:रूम वर जाऊन लैंगिक शोषण….भाड्याने मिळत होत्या बंद खोल्या…..भडगाव परिसरातील लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या बंद खोल्यामध्ये चालतो असाच खेळ? नैतिकतेचा होतोय का ऱ्हास! लाखोंची कमाई….वाचा सविस्तर….(भाग -१)- गोपनीय बातमीदार


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा | सध्याच्या काळात प्रेमाच्या नावाखाली शारीरिक आकर्षणाचे पेव फुटले असून, याचे रूपांतर एका मोठ्या सामाजिक समस्येत होताना दिसत आहे. ग्रामीण आणि शहरी भागांत सुरू झालेले लॉजिंग व्यवसाय हे प्रत्यक्षात अनैतिक संबंधांचे सुरक्षित अड्डे बनत चालले आहेत की काय? असा संतप्त सवाल आता सुजाण नागरिकांकडून विचारला जात आहे. अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडिओ कांड समोर आले असून या संदर्भात ४५ सदस्यांची एसआयटी समिती गठित करण्यात आळ8 आहे. हे असे प्रकार होतात कसे तर अनेक लॉजिंग चालक ‘सुप्रीम कोर्टाचे आदेश’ किंवा ‘हायकोर्टाचे जजमेंट’ यांचा आधार घेऊन आपला व्यवसाय रेटून नेत आहेत. कायद्याने सज्ञान व्यक्तींना एकत्र राहण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरी त्याचा गैरफायदा घेत तासाभराच्या हिशोबाने खोल्या भाड्याने देणे हा प्रकार सर्रास सुरू आहे. कोणत्याही वैध नात्याचा पुरावा न घेता, केवळ आर्थिक फायद्यासाठी तरुण मुले-मुली आणि विवाहित स्त्री-पुरुषांना बंद खोली उपलब्ध करून दिली जात आहे. एखाद्या महिलेला किंवा मुलीला जेव्हा पुरुष लॉजिंगवर घेऊन जातो, तेव्हा त्यांच्यातील नात्याची शहानिशा करणे लॉजिंग चालकाचे कर्तव्य आहे. शहरात किंवा ग्रामीण भागात कामानिमित्त आलेल्या लोकांसाठी निवासाची सोय असणे रास्त आहे, मात्र ‘एकांतात’ वेळ घालवण्यासाठी खोल्या देणे हा शुद्ध वेश्या व्यवसायाला दिलेला अभय देणे आहे. अनेक लॉजिंग चालक बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली पोलिसांवर दबाव आणून हे ‘काळे धंदे’ बिनधास्तपणे चालवत असल्याचे चित्र आहे. कमी वेळात श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी लॉजिंग चालक समाजाच्या नैतिकतेशी खेळत आहेत. यावर प्रशासनाचा आणि कायद्याचा लगाम कधी बसणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • लॉजिंगमध्ये येणाऱ्यांची सखोल चौकशी का केली जात नाही?
  • त्यांच्या भेटीचे ठोस कारण आणि कामाची नोंद का ठेवली जात नाही?
  • पोलीस विभाग शहरातील आणि महामार्गावरील लॉजिंगचे रेकॉर्ड्स नियमितपणे का तपासत नाही?

आज अनेक मुली आणि महिला यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत क्षणिक मोहापायी घरदार सोडून निघून जातात. यात केवळ प्रेम नसून शारीरिक आकर्षण आणि चुकीच्या मार्गाने मिळणारा पैसा हे मुख्य घटक आहेत. अशा कृत्यांना लॉजिंग सारख्या जागा खतपाणी घालत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि अस्मितेला काळिमा फासणारी आहे.

जर वेळीच अशा अनैतिक व्यवसायांना चाप लावला नाही, तर भविष्यात कौटुंबिक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने लॉजिंगच्या नोंदणी पुस्तकांची (Registers) कडक तपासणी करून, विनाकारण किंवा संशयास्पद कारणांसाठी खोल्या देणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे काळाची गरज आहे.
…. लवकरच दुसरा भाग…..


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button