नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण

पाचोरा पोलिसांची कारवाई! काही तासांतच दोन चोरीचे गुन्हे उघड, मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात


Advertisements
Ad 4

पाचोरा (प्रतिनिधी):पाचोरा शहर आणि परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. केवळ तीन तासांच्या अवधीत चोरीचे दोन मोठे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीला गेलेले तीन एअर कंडिशनर्स (AC) आणि सोन्याची पोत असा एकूण १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या वेगवान तपासचक्रांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्सा नगर (जारगाव) येथील एका गोदामातून ९४ हजार ५०० रुपये किमतीचे ‘गोदरेज’ कंपनीचे तीन एसी चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. १७७/२०२६ नुसार गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमान नगर, पाचोरा) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून एसीसह अन्य एका गुन्ह्यातील (रजि. नं. १७४/२०२६) ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत देखील जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईत पोलीस पथकातील विलास पाटील, वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, संदीप राजपूत आणि गणेश कुंवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button