नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याशैक्षणिक

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; कीर्ती माळी ७१.१७% गुणांसह प्रथम


Advertisements
Ad 4

भडगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, भडगाव येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेची कीर्ती विजय माळी हिने ७१.१७% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून कला शाखेचा निकाल ६३.६३% लागला आहे. विज्ञान शाखेत अश्विनी शिंदे व श्रद्धा पाटील, तर कला शाखेत संध्या खैरे व कंचन सोनवणे यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. एकनाथ गरबड महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि संचालकांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले आहे. प्राचार्य एस.पी. रोकडे, पर्यवेक्षक एस.पी. बोरसे आणि शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली ‘सावित्रीच्या लेकींनी’ घेतलेल्या या गगनभरारीमुळे संपूर्ण भडगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे. उत्तुंग यश मिळवणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थिनींवर सध्या परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button