नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक

भावाकडून वाढदिवसाची अनोखी भेट; रुपेश हटकर यांची पोलिस दलात निवड!


Advertisements
Ad 4

पाचोरा:सामान्य परिस्थितीतून जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर हटकर बंधूंनी यशाची उत्तुंग झेप घेत पाचोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे उमेश उर्फ बंटी हटकर यांचा २१ मे रोजी वाढदिवस साजरा होत असतानाच, त्यांचे लहान बंधू रुपेश हटकर यांची महाराष्ट्र राखीव पोलीस दलात (SRPF) निवड झाल्याची अत्यंत मानाची व आनंदाची बातमी धडकली. मोठ्या भावाच्या वाढदिवसाच्याच दिवशी मिळालेले हे यश म्हणजे धाकट्या भावाकडून मिळालेली एक अनोखी आणि कौतुकास्पद वाढदिवस भेट ठरली आहे. एकाच वेळी वाढदिवसाचा उत्साह आणि शासकीय सेवेतील निवडीचा आनंद यामुळे हटकर कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उमेश उर्फ बंटी हटकर हे पाचोरा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. कविता उमेश हटकर या नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, आता रुपेश यांच्या रूपाने कुटुंबात आणखी एक यशाचे शिखर सर झाले आहे. रुपेश यांच्या या सुवर्ण यशाबद्दल मंगेश देवरे, ‘मधुर खान्देश’ वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन, पत्रकार नंदकुमार शेलकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील आणि अश्विन हटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नागरिकांनी हटकर बंधूंचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button