नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्यामनोरंजनराजकारणराज्यशैक्षणिकसंपादकीय

पाचोऱ्यात ग्राहकांची फसवणूक का? ‘लाल स्वस्तिक’ कापड दुकानावर गुन्हा दाखल करण्याची मागणी! फसव्या स्कीम वापरून व्यवसाय करणे अत्यंत चुकीचे शहरातील व्यापारी वर्ग कडून नाराजीचा सूर


Advertisements
Ad 4

पाचोरा:पाचोऱ्यातील ‘लाल स्वस्तिक’ कापड दुकानासह काही व्यापाऱ्यांकडून ‘उरलेला माल’ (शिल्लक स्टॉक) अर्ध्या किमतीत विकण्याच्या नावाखाली ग्राहकांची उघडपणे फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कमी किमतीत ब्रँडेड माल’ अशा भपकेबाज जाहिरातींना बळी पडून ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांची या दुकानांवर गर्दी होत आहे. या वाढत्या गर्दीमुळे दुकानांमध्ये चेंगराचेंगरीची भीती निर्माण झाली असून, एखादा निष्पाप बळी गेल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. संबंधित दुकानदारांवर प्रशासनाने तात्काळ दंडात्मक कारवाई करावी किंवा गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

जाहिरातीचा सुळसुळाट अन् ग्राहकांची लूट!

मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाल स्वस्तिक’ कापड दुकानातून जुना, कालबाह्य आणि उरलेला माल अत्यंत कमी दरात देण्याच्या भूलथापा मारल्या जात आहेत. स्वस्त कापडाच्या मोहापाई पाचोऱ्यासह परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनता येथे धाव घेत आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या पदरी निकृष्ट दर्जाचा माल पडत असून, ही एक प्रकारची संघटित फसवणूकच असल्याचा आरोप होत आहे.

चेंगराचेंगरीची शक्यता; प्रशासनाचे दुर्लक्ष?

या कथित ‘सेल’च्या ठिकाणी ग्राहकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. दुकानांमध्ये पाय ठेवायला जागा नसून प्रचंड गर्दी होत आहे. जर या गर्दीत एखादी अनुचित घटना घडली किंवा चेंगराचेंगरी झाली, तर होणाऱ्या जीवितहानीला हे बेजबाबदार व्यावसायिक की ढिम्म प्रशासन जबाबदार राहणार? असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत. मोठी दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे.

“हा तर व्यापारी धर्माचा द्रोह!” – स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

पाचोऱ्यातील या अनैतिक व्यापार पद्धतीवर इतर प्रामाणिक व्यापारी बांधवांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की:
“अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करून आणि फसवणूक करून व्यवसाय करणे आमच्या व्यापारी बुद्धीला न पटणारे आहे. केवळ स्वतःचा फायदा पाहण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील भोळ्या ग्राहकांना लुटणे चुकीचे आहे. यामुळे संपूर्ण पाचोऱ्याच्या व्यापारी जगताची बदनाम होत आहे.”

एकीकडे निकृष्ट मालाची विक्री करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे, तर दुसरीकडे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे ‘लाल स्वस्तिक’ कापड दुकानाच्या या मनमानी कारभारावर पाचोरा नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ संयुक्त कारवाई करावी. अन्यथा, ग्राहकांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात येईल येईल, असा इशारा सुज्ञ नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button