जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीय
नगरदेवळा पोलिसांची तत्परता: ३ तासांपासून बेपत्ता असलेल्या ३ वर्षीय बालकाची आईशी घडवून दिली भेट!

नगरदेवळा:
सिल्लोड येथील रहिवासी असलेला ३ वर्षांचा चिमुरडा, यश समाधान शेजवळ, हा मागील ३ तासांपासून नगरदेवळा गावातून बेपत्ता झाला होता. बालकाच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच नगरदेवळा आउटपोस्टच्या पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली.
नगरदेवळा ओपीचे पोलीस शिपाई दिनेश पाटील आणि पोलीस हवालदार माजिद पठाण यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नगरदेवळा गाव आणि परिसरात शोधमोहीम राबवली. पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, त्यांनी बालकाचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे त्याची आई कावेरी समाधान शेजवळ (रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या स्वाधीन केले. वेळेत मदत करून मुलाला सुखरूप शोधून दिल्याबद्दल शेजवळ कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी नगरदेवळा पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.






