नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

पोलिसांची सतर्कता आणि सोशल मीडियाचा वापर करत तीन वर्षीय चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट! पोलीस कर्मचारी हरीश परदेशीचे अभिनंदन


Advertisements
Ad 4

पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झालेल्या एका तीन वर्षीय चिमुकल्याचा शोध लावण्यात पोलिसांना दोन दिवसांत यश आले आहे. पोलीस कर्मचारी हरीश परदेशी यांनी दाखवलेली तत्परता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे एका भिक्षुक कुटुंबाचा विखुरलेला संसार पुन्हा एकत्र आला असून, पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे गोसालपूर (जबलपूर, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असलेले राजवीर फकीर (वय ४५) आणि त्यांची पत्नी बालवीर फकीर हे कुटुंब रेल्वे स्थानक व परिसर यामध्ये भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा राजवीर फकीर हा रेल्वे स्थानक परिसरातून अचानक बेपत्ता झाला होता. यानंतर हवालदिल झालेल्या पालकांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला.

रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिस कर्मचारी सागर पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हरीश परदेशी यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून हरीश परदेशी यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तसेच सोशल मीडियाच्या काही महत्त्वाच्या ग्रुप्सचा वापर करत या बालकाचे फोटो विविध गावांतील ‘पोलीस पाटील’ यांच्यापर्यंत पोहोचवले आणि चौकशी सुरू केली.

या तपासादरम्यान, जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये हा लहान मुलगा एका महिलेसोबत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी सतर्कता पाहून, संबंधित महिलेने वस्तुस्थिती समोर आणली. खेळता खेळता नजरचुकीने तो मुलगा आपल्यासोबत आल्याचे सांगत, तिने दोन दिवस त्याचा सांभाळ केला होता. मात्र, पोलिसांचे आवाहन पाहताच तिने स्वतःहून पुढे येत बालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पाचोरा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर या तीन वर्षीय चिमुकल्याला अत्यंत सुरक्षितपणे त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. दोन दिवसांपासून पोटच्या गोळ्यासाठी व्याकुळ झालेल्या आई-वडिलांच्या डोळ्यात आपल्या मुलाला सुखरूप पाहून आनंदाश्रू तरळले.

“पोलीस कर्मचारी हरीश परदेशी यांनी दाखवलेले कसब, पोलीस यंत्रणेचा योग्य वापर आणि सामाजिक भान यामुळे एका निष्पाप बालकाला त्याचे हक्काचे छप्पर आणि आई-वडील परत मिळाले. खाकी वर्दीतील या माणुसकीच्या भूमिकेमुळे पाचोरा पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे.”


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button