जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय
पाचोरा नगरपालिकेकडून कर भरण्याचे आवाहन; ३१ जुलैनंतर दरमहा २% शास्ती लागणार

पाचोरा: पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारक आणि भोगवटदारांना चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) व पाणीपट्टी कर तात्काळ भरण्याचे जाहीर आवाहन नगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. ज्या नागरिकांकडे कराचा भरणा बाकी असेल, त्यांनी नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत वसुली पथकाकडे आपली थकबाकी जमा करावी.
नगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, ३१ जुलै २०२६ पर्यंत कराचा भरणा न केल्यास १ ऑगस्टपासून थकीत रक्कमेवर प्रतिमहा २% शास्ती (दंडात्मक रक्कम) आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दंडात्मक कारवाई व अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी वेळेत कर भरून पाचोरा नगरपरिषदेस सहकार्य करावे, अशी विनंती मुख्याधिकारी मंगेश देवरे, पाचोरा नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आली आहे.





