पाचोऱ्यातील शिवसैनिकांना जिल्ह्याची जबाबदारी! दोन पत्रकार बांधवांची राजकारणाकडे वाटचाल तर कृष्णपुरीतील शेतकरी पुत्राला देखील वरच्या फळीत स्थान

मधुर खान्देश वृत्तसेवा : दि. 13 मे 2025 रोजी हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षातील पाचोरा व भडगांव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मागील काळामध्ये उत्कृष्ट शेती विषयक बातम्या टाकून शेती विषयक बातम्या प्रकाशित करून शेतकऱ्यांनान्याय देण्याचे पत्रकार म्हणून काम करणारे सुनिल रंगराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी सेना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच तळागाळातील कार्यकर्ते कृष्णापरी परिसरातील रहिवासी असलेले शेतकरी पुत्र हेमंत ज्ञानदेव चव्हाण यांची शेतकरी सेनेच्या उपजिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पाचोरा शहरात वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत समाजसेवेचा वसा हाती घेतलेले अभ्यासू पत्रकार प्रविण हरिषचंद्र ब्राम्हणे यांची भीमशक्ती शिवशक्ती जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर माहेजी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नरेश पंडितराव पाटील यांची जिल्हाध्यक्ष एस.टी. कामगार सेना म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख मनोहर (रावसाहेब) पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. सदर निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे.