दि पाचोरा पीपल्स बँकेच्या विरुद्ध उपनिबंधक जळगाव यांच्याकडे तक्रार!

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा शहरातील रहिवासी असलेले मुस्ताक मन्सूर पिंजारी यांची वडिलोपार्जित घर जागा सिटी सर्वे नंबर 291 क्षेत्र 33.4 चौरस मीटर यावरती सन 1964 मध्ये इस्माईल कडू पिंजारी यांनी मात्र पाचशे रुपये कर्ज घेतले होते. आणि नियमाप्रमाणे त्यांनी ते परतही केले असल्याची निल पावती मुस्ताक मंजूर पिंजारी यांच्याकडे असून देखील कालांतराने दि पाचोरा पीपल्स को ऑफ बँक,पाचोरा यांनी सदरची जागा मूळ मालकाला परत न करता परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकून टाकली असल्याचे दस्त मुस्ताक पिंजारी यांना प्राप्त झाले आहे. दि पाचोरा पीपल्स को ऑफ बँक, पाचोरा यांच्या मनमानी कारभाराला संचालकीय मंडळ सह संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर भादवि कलम 420 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याबाबत पत्र जिल्हा उपनिबंधक सो. सहकारी संस्था जळगाव यांना दिनांक 15 मे, 2025 रोजी पत्र देण्यात आले आहे. दि पाचोरा पीपल्स को ऑफ बँकेच्या कारभाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा व मुस्ताक मन्सूर पिंजारी यांना त्यांची जागा परत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.



