नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

ओबीसी तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मंत्री पदी वर्णी; मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस अन् अजित पवारांचे मानले आभार


Advertisements
Ad 4

मुंबई : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारांना जागत, येवला-लासलगावच्या जनतेच्या आणि समस्त ओबीसींच्या विश्वासाच्या,आशीर्वादाच्या जोरावर महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी शपथ घेतली असून महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप दाखवणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा व सर्वसमावेशक कामाचा आणि माझे बंधू लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षमय व झुंजार वाटचालीचा आदर्श सदैव माझ्यासमोर राहील तसेच भारतीय संविधानाची तत्वे, विचार व आदर्शांवर चालत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व झोकून देऊन काम करण्याचा निश्चय मी पुन्हा एकदा या निमित्ताने केला आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेतच, असा मला विश्वास आहे.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे मी मनापासून आभार मानतो.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button