नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव बियर बार असोसिएशनच्या वतीने बियरबार बंद आंदोलन! स्थानिक प्रशासनाला निवेदन


Advertisements
Ad 4

आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व परमिट रूम बियरबार व्यवसायिक बांधवांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट टॅक्स व वाढीव नूतनीकरण फी बाबत निषेध म्हणून एक दिवसीय परमिट रूमबियर बार बंद पुकारण्यात आला होता. 

सरकारने मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिक बांधवांचा विचार करावा व न्याय द्यावा दैनंदिन वाढत चाललेली अवैध मद्य विक्री ही बियरबार व्यावसायिकांसाठी धोक्याची घंटा आहे ‘अश्या विविध मागणीसाठी पाचोरा भडगाव बियर बार असोसिएशनच्या वतीने पाचोरा येथील प्रांत अधिकारी भूषण अहिरे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अशोक पवार व दारूबंदी विभागाच्या कार्यालयात कर्मचारी गिरीश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाचोरा येथील कार्यालयात पाचोरा येथील बियर बार धारकांच्या वतीने कर्मचारी गिरीश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
पाचोरा त्याचबरोबर भडगाव तालुक्यातील सर्व परमिट रूम बियर बार व्यवसायिक बांधवांच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निवेदन देतांना.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button