नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या

तुमची तडजोड शक्य असेल तर घ्या लोकन्यायालयाचा आधार! पाचोरा न्यायालयाच्या वतीने नागरिकांना अवाहन


Advertisements
Ad 4

पाचोरा : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे आदेशावर पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती पाचोरा मार्फत राष्ट्रीय लोकन्यायालय दिनांक 22.03. 2025 रोजी पाचोरा न्यायालयात आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश श्री जी. बी. औंधकर सह दिवाणी न्यायाधीश श्री. एस.व्ही.निमसे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी एस बोरा व ज्येष्ठ वकील मंडळी उपस्थित होते. या लोक न्यायालयामध्ये नियमित दिवाणी दावे, नियमित दरखास्त, संक्षिप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर, वैवाहिक प्रकरणे न्यायालयातील प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे असे दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येतील. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, मोबाइल कंपनी, दूरध्वनी व वीज कार्यालय, ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी बाबतची वादपूर्व प्रकरणे, थकीत रकमेमध्ये सूट देणे बाबत प्रस्तावित केलेले आहे याप्रसंगी उपस्थितितांनी पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की दिनांक 22.03.2025 रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात प्रलंबित वादातीत व वादपूर्व प्रकरणे तडजोडीने सोडविणे करता जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोकन्यायालय या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button