जळगाव जिल्हाराज्य
पाचोऱ्यातील वकील भाग्यश्री महाजन महिला शौर्य पुरस्काराने सन्मानित!

जळगाव येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे पाचोरा येथील शिक्षक के एस महाजन यांची कन्या ॲड. भाग्यश्री कैलास महाजन (पाटील) यांना “राणी झलकारी वीरांगना महिला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. दि. 23 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात महाजन यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित करण्यात आले असून यावेळी पुरस्कार घेतांना के.एस महाजन व त्यांनी कन्या भाग्यश्री महाजन उपस्थित होत्या सदर पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.