पाचोरा तालुका शिवशक्ती भीमशक्तीच्या तालुका प्रमुख पदी विक्की विजय बाविस्कर यांची निवड!

वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या शिवशक्ती भीमशक्ती च्या तालुका प्रमुख पदी विक्की बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आयोजित मेळाव्यात पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले असून पुढील सामाजिक कार्य करण्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तर जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे यांनी देखील त्यांचा शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंद दिघे यांचे शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करत शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी त्यांना पत्र दिले आहे.