नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाराज्यशैक्षणिक

सर्पदंश झाल्याची चर्चा…..अन् पालक झाले सावध! पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरातील इंग्रजी माध्यम स्कूलमध्ये जाणाऱ्या पालकांसाठी आवाहन! तुमच्या पाल्याचे ॲडमिशन करताय? मग आधी हे वाचा आणि सावधान व्हा…


Advertisements
Ad 4

पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा):

आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अनेक पालक मोठ्या आशेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. परंतु, शाळा प्रशासनाकडून मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार पिंपळगाव हरेश्वर परिसरात समोर आला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात किंवा सध्या आपल्या मुलाचे प्रवेश (Admission) करताना पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, परिसरातील एका नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला सर्पदंश झाल्याचा संशय व्यक्त झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्याला पाचोरा येथील रुग्णालयात तीन दिवस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, घडलेली गंभीर घटना बाहेर उघडकीस येऊ नये आणि शाळेची बदनामी टाळावी, यासाठी संस्थाचालकांनी ही बाब पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला. ‘मधुर खान्देश’ने यासंदर्भात प्राथमिक स्वरूपात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बातमीच्या प्रभावानंतर संस्थाचालकांनी सदर विद्यार्थ्यावर चांगल्या रुग्णालयात उपचार करून त्याला सुखरूप घरी आणले खरे; परंतु जर साप चावलाच नव्हता, तर विद्यार्थ्याला तीन ते चार दिवस रुग्णालयात का ठेवावे लागले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पीडित पालक साधे-भोळे असल्याने शाळा व्यवस्थापनाकडून त्यांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन या संपूर्ण प्रकरणातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या परिसरातील पालकांनी शाळेत जाऊन प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण पिंपळगाव हरेश्वर परिसरात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेत पुरेशी सुरक्षा, प्रथमोपचार व्यवस्था आणि इतर आवश्यक सोयी-सुविधा आहेत का, याची सखोल पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ चकचकीत इमारतींवर न भुलता मुलांच्या जीवाचा आणि भविष्याचा विचार पालकांनी करावा. या प्रकरणाची दखल घेत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळींनी हा विषय लावून धरला आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही आणि शिक्षणाचा योग्य दर्जा नाही, अशा शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका, असे आवाहन ‘मधुर खान्देश’च्या माध्यमातून सर्व पालकांना करण्यात येत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button