नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात ‘लंडन किड्स’ या आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्रिस्कूलचे भव्य उद्घाटन आमदार किशोर आप्पा यांच्या हस्ते संपन्न


Advertisements
Ad 4

पाचोरा शहरात जागतिक दर्जाच्या शिक्षणाची नवी वाट उघडणाऱ्या ‘लंडन किड्स’ या आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्लेग्रुप व प्रिस्कूलच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वामी समर्थ केंद्राच्या शेजारी, संघवी कॉलनी पाचोरा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेला भेट दिली आहे. या शाळेचे उद्घाटन आमदार किशोर धनसिंग पाटील (आमदार पाचोरा-भडगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्यासह पाचोऱ्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिक, पालकवर्ग आणि लहान बालकांची मोठी उपस्थिती होती. लंडन किड्स हे युके कॉन्सेप्टवर आधारित एकआंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रिस्कूल असून त्यात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी अशा सर्व शैक्षणिक टप्प्यांचा समावेश आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या संस्थेमध्ये ऑडियो-व्हिडीओ शिक्षण पद्धती, योगा फिटनेस प्रोग्राम, संगीत व हस्तकला अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना स्मार्ट व शार्प बनविण्याचा उद्देश आहे.’London Kids म्हणजेच Smart Kids’ या ब्रीदवाक्याला साजेशी व्यवस्था या प्रिस्कूलमध्ये करण्यात आली असून, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीत, डॉक्टर ऑन कॉलसह मासिक वैद्यकीय तपासणी, जागतिक स्तरावरील अवॉर्डप्राप्त ब्रँड, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, हवेशीर आणि सुरक्षित जागा, अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. हा ब्रँड२७ राज्यांमध्ये विस्तारलेला असून, एकूण १३७५ सेंटर कार्यरत आहेत. २०१९ साली ‘सिलिकॉन इंडिया’तर्फे ‘मोस्टप्रॉमिसिंग प्रिस्कूल’ आणि ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ असा प्रतिष्ठेचा जागतिक पुरस्कारही या संस्थेला मिळालेला आहे.कार्यक्रमात संचालक मंडळाचे जितेंद्र बंसिलाल जैन (चेअरमन), नितीन स्वतंत्र जैन (कोषाध्यक्ष), महावीर दिलीप श्रीश्रीमाळ, यश मनोज संघवी, डॉ. प्रितेश पन्नालाल संकलेचा, आदेश विजय संघवी, डॉ. रोहित सतीश बोथरा (सेक्रेटरी), इंजी. कल्पेश नेमीचंद धाडीवाल, इंजी. भुषण अनिल बांठीया, कमलेश केवलचंद सुराणा, रोशन दिलीप पारख, मयुर सुनिल बाफना आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शाळेच्या प्रिंसिपल सौ. प्रियंका कुमावत यांच्यासह शिक्षकवृंद सौ. चांदनी चेतन ओझा, सौ. मेहेर अनिल नागरानी मॅडम आहे तसेच कु. भावना संजय चोरडिया ह्या योगा व मेडिटेशनसाठी शिक्षिका असणार आहे . तसेच नवकार ग्रुप, पाचोरा, प्रथम राजेंद्र बाफणा, अनुप विजय बरमट आणि सुरेश सुपडू पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. उद्घाटनानंतर ४ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत Free Activity Camp घेण्यात येणार असून, यामध्ये लहान मुलांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘Enroll Now Limited Seats’ अशी विशेष घोषणा करून पालकांना नावनोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, उत्सवी वातावरणात, शिस्तबद्ध व कलात्मक पद्धतीने पार पडला. पालकांनी व उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सुविधांचे व संकल्पनेचे भरभरून कौतुक केले. London Kids ही संकल्पना पाचोऱ्यातील बालशिक्षण क्षेत्राला नवा आयाम देणारी ठरणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांचे व स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले. उपस्थित सर्व नागरिकांनी या नवनवीन उपक्रमाचे स्वागत करत संस्थेला शुभेच्छा दिल्या.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button