नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

नागरिकांच्या सतर्कतेमुळे पाचोऱ्यात चोर रंगेहात पकडले! पोलिसांत गुन्हा दाखल.


Advertisements
Ad 4

पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरील एका गोडावुनचे लाॅक तोडुन गोडावुन मधील १ लाख रुपये किंमतीचा वस्तू घेवुन जात असतांना गुरुकुल शाळे समोरील भागातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने तीन चोरट्यांना ताब्यात घेतले.

पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरिल कालिंका पोल्ट्री फार्म जवळ जयप्रकाश अमरलाल जाधवाणी रा. गणपती नगर, जळगाव यांचे दारुच्या रिकाम्या बाटल्या ठेवण्याचे गोडावुन आहे. १३ एप्रिल रोजी रात्रीच्या ११:४० वाजेच्या सुमारास मोहन धोंडु पाटील, सोनु प्रकाश पाटील रा. गलवाडे ता. सोयगाव, भुषण दिनकर म्हासरे रा. निंभोरा ता. सोयगाव हे तिघ गोडावुनचे लाॅक तोडुन आत प्रवेश करत काचेच्या, अल्युमिनियमच्या,प्लास्टिकच्या वेगवेगळ्या ब्रांडच्या खाली बाटल्यांची चोरी करतांना याठिकाणाहुन गस्तीवर जात असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके,पो. हे. काॅ. राहुल शिंपी, पोलिस काॅ. योगेश पाटील वाहन चालक अशोक पाटील,होमगार्ड चंद्रकांत महाजन,राज अमृतकर यांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेत. त्यांचे विरुद्ध जयप्रकाश जाधवाणी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याकामी पोलिस कर्मचारी संदीप राजपूत,जितेश पाटील यांनी काम पाहिले सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो‌. हे. काॅ. राहुल शिंपी हे करीत आहेत. आरोपींना पाचोरा कोर्टात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button