नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पकडला आरोपी! मुद्देमाल जप्त


Advertisements
Ad 4

पाचोरा (प्रतिनिधी):पाचोरा शहर पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्ध अत्यंत प्रभावी आणि वेगवान पाऊल उचलले आहे. जामनेर रोडवरील पेट्रोल पंपावरून चोरीला गेलेली दुचाकी शोधून काढत, पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची कामगिरी केली आहे. फिर्यादी प्रशांत शंकर वाघ (रा. सातगांव डोंगरी, ता. पाचोरा) यांनी १० मार्च २०२६ रोजी आपली लाल रंगाची ‘हिरो पॅशन प्रो’ मोटारसायकल (क्र. MH-19 BR-4211) जामनेर रोडवरील राधाकृष्ण पेट्रोल पंपाजवळ उभी केली होती. तिथून ती अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी १४ मार्च रोजी दुपारी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी आणि पोकॉ शरद मांगो पाटील यांनी तपास केला असता भारत डेअरी बस स्टॉपजवळ एक संशयित इसम दुचाकीसह टेहळणी करत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून तुषार लक्ष्मण आघाडे (वय २७, रा. सातगांव डोंगरी) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १५,००० रुपये किमतीची चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ४ तासांत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आणि पोहेकॉ राहुल शिंपी यांनी तपास पूर्ण करून १२ तासांच्या आत पाचोरा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या या तत्परतेचे तालुक्यात कौतुक होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button