नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीय

पाचोरा पालिकेकडून मालमत्ता करधारकांसाठी ‘अभय योजना’ जाहीर; दंडाच्या रकमेत १००% सूट!


Advertisements
Ad 4

पाचोरा शहरातील मालमत्ता करधारकांसाठी नगरपरिषदेने मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या ३० मार्च २०२६ च्या निर्णयानुसार, शहरात ‘अभय योजना’ राबवण्यात येत असून, थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) रकमेत १००% सूट देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२६ शेवटचा दिवस
या योजनेचा लाभ घेण्यासाठी करधारकांनी आपला संपूर्ण थकीत कर ३१ मार्च २०२६ पर्यंत भरणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्च रोजी नगरपरिषद कार्यालय सकाळी ८:०० वाजेपासून सुरू राहणार आहे.
अभय योजनेच्या महत्त्वाच्या अटी:

  • दंडात १००% माफी: १९ मे २०२५ पूर्वीच्या थकीत शास्ती/दंड रकमेवर पूर्णपणे सूट मिळेल.
  • एकरकमी भरणा: थकीत कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यासच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • मूळ करात सवलत नाही: सवलत केवळ दंडाच्या रकमेवर असून, मूळ मालमत्ता करात कोणतीही सूट मिळणार नाही.
  • पाणीपट्टी अनिवार्य: मालमत्ता करासोबतच थकीत पाणीपट्टी भरणे देखील बंधनकारक असेल.
  • अर्ज करणे आवश्यक: योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात नगरपरिषदेकडे अर्ज करणे गरजेचे आहे.

प्रशासनाचे आवाहन:
“शहराच्या विकासासाठी मालमत्ता कराचा भरणा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला थकीत कर उद्या सायंकाळपर्यंत जमा करावा आणि दंडाच्या रकमेतून सवलत मिळवावी,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनाही आपापल्या प्रभागातील नागरिकांना या योजनेची माहिती देऊन सहकार्य करण्याचे विनंती करण्यात आली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button