नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्य

पाचोऱ्यातील पीएमजे एडवेंचर पार्कला ‘बिग बॉस’ फेम अभिनेते सचिन कुमावत यांची भेट


Advertisements
Ad 4

पाचोरा: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ फेम अभिनेते सचिन कुमावत यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी पाचोरा येथील पीएमजे एडवेंचर पार्कला सदिच्छा भेट दिली. खानदेशी बोलीभाषेतील गाणी सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या सचिन दादांचे याठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. पार्कचे संचालक संदीप जैन यांच्या पत्नी रूपाली जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पाटील,अनिता ताई पाटील यांनी सचिन कुमावत यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी संचालक संदीप जैन यांनी त्यांना एडवेंचर पार्क मधील विविध उपक्रम आणि वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली.

या भेटीचे खास आकर्षण म्हणजे सचिन कुमावत यांच्या लोकप्रिय ‘रस प्यायला ये म्हणलं माय’ या अहिराणी गाण्यावर झालेला जबरदस्त डान्स. जॅक्शन डान्स अकॅडमीचे मानव सलोमन आणि त्यांच्या टीमने या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी ‘मधुर खान्देश’चे संपादक राहुल महाजन आणि पत्रकार सचिन चौधरी यांनी पुढाकार घेतला होता. एडवेंचर पार्कला दिलेल्या या विशेष भेटीबद्दल आयोजकांच्या वतीने सचिन कुमावत यांचे आभार मानण्यात आले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button