नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिकसंपादकीय

पाचोरा तहसील कार्यालयाची धडक कारवाई; वाक येथून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन १२ चाकी डंपर जप्त


Advertisements
Ad 4

पाचोरा: प्रांताधिकारी यांच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सने रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. मौजे वाक (ता. भडगाव) येथून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारे दोन तब्बल १२ चाकी डंपर या पथकाने रंगेहात पकडले. कारवाईनंतर हे दोन्ही डंपर तात्काळ जप्त करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ते पाचोरा येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.ही धडक कारवाई मध्यरात्री ठीक २ वाजता वाक (ता. भडगाव) परिसरामध्ये करण्यात आली. पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी पहिले १२ चाकी डंपर हे विना नंबरचे असून ते आप्पा पाटील यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे, तर दुसरे डंपर सचिन युवराज काळे यांच्या मालकीचे आहे. या यशस्वी कारवाईत प्रांताधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील मंडळ अधिकारी आर. डी. पाटील व राहुल पवार, तसेच ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अतुल पाटील, अविनाश जंजाळे, अजमल शहा मकानदार आणि निखिल बळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अशीच कडक मोहीम यापुढेही सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button