नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिक

मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी १७ ऑगस्ट रोजी पाचोरा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण


Advertisements
Ad 4

पाचोरा / नगरदेवळा:
नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील सकल मांग गारुडी समाजाच्या विविध प्रलंबित विकासात्मक मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा येथील तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

सकल मांग गारुडी समाजाचे अध्यक्ष सुरेश नाना राखपसरे (नगरदेवळा) आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा तहसीलदार, प्रांत कार्यालय, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत नगरदेवळा यांना याबाबतचे सविस्तर निवेदन दिले आहे. प्रशासनाने मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास १७ ऑगस्टपासून तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मांग गारुडी समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“आपसातील सर्व मतभेद, श्रेयवाद आणि हेवेदावे बाजूला ठेवून, पाचोरा, जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील समाजनेते, समाजसेवक आणि समाजबांधवांनी १७ ऑगस्ट रोजी सकाळी पाचोरा तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. उपोषणकर्त्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाच्या मनोबलात वाढ करावी आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा.”
शाहीर वाल्मीक फाजगे (खेडगावकर), समाज हितचिंतक


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button