नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाच्या वतीने जिल्हा शांतता कमेटी सदस्य किशोर डोंगरे यांचा सन्मान!


Advertisements
Ad 4

सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाच्या मदतीने आव्हान करणार…
आयु.किशोर डोंगरे

जळगाव: दि. 25 मार्च रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद,पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह विविध पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे,असे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच, समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे. विशेषतः 15 ते 25 वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी,असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले.


●जिल्हा शांतता समीतीच्या सदस्यानां विविध सूचना देण्यात आल्या – आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात, शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शहरारील मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमण मुक्त करावेत.
बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पाचोरा येथील जेष्ठ समाजिक कार्यकर्ता, समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा शांतता कमेटी सदस्य किशोर डोंगरे यांना हेल्मेट देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार व शांतता कमेटी सदस्य आबासाहेब येवले उपस्थित होते.पाचोरा शहर हे शांतप्रिय जातीय सलोखा,बंधूभाव राखणारे शहर आहे.शहरात किंवा तालुक्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोरा पोलिस प्रशासनांच्या सहकार्याने चोख नियोजन आम्ही करणार आहोत तसेच सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाच्या मदतीने अवाहन देखिल करणार आहोत असे किशोर डोंगरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले, तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button