पाचोरा तालुक्यातील १०० सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर बघा! ग्रामपंचायत निवडणुकीची गावागावात वातावरण तापणार

पाचोरा येथे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये दि.२१ एप्रिल २०२५ रोजी कृषिरत्न माजी आमदार कै. तात्यासाहेब आर.ओ. पाटील, व्यापारी भवन, पाचोरा येथे पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणेकामी सोडत सभा तहसिलदार विजय बनसोडे पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती व निश्चीत केलेल्या सरपंच पदामधुन अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नामाप्र महिला, व सर्व साधारण महिला सरपंच पद थेट व सोडतीने निश्चित करणेकरीता उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचे अध्यक्षतेखाली उक्त नमुद केलेल्या ठिकाणी दुपारी २ वाजता सभा घेण्यात आली आहे. त्यानुसार पाचोरा तालुक्यातील एकुण १०० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सन २०२५- ३० या कालावधी करीता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.

